शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ , सरकारला लाज कशी वाटत नाही

शेअर करा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई इथे बोलताना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून स्वतःचे अवयव विकण्याचे जाहीर केलेले आहे . कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ यावी हे छत्रपती शिवाजी महाराज , शाहू महाराज , महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे मात्र राज्य सरकारला याची लाज वाटत नाही अशी टीका केलेली आहे.

नाना पटोले म्हणाले की , दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे शेतमालाला भाव नसल्याने शेतात शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत मात्र सरकार शेतकऱ्यांना भरघोस मदत केल्याच्या केवळ पोकळ घोषणा करत आहे.

यावर्षीचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला असून सरकारला शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देण्यास वेळ राहिलेला नाही . हेलिकॉप्टरने शेतात जाऊन आपण शेतकरी असल्याचा देखावा मुख्यमंत्री करत असतात मात्र त्यांच्याच राज्यात लाखभर रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्यावर अवयव विकण्याची वेळ आलेली आहे. भाजप सरकार उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ करते मात्र गोरगरीब नागरिकांचे अवघे एक लाख एक-दोन लाखांचे कर्ज देखील सरकार माफ करत नाही यावर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारू असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा