पारनेरमध्ये महिलेसह मुलाला गाडी अंगावर घालून चिरडलं , आरोपीस अखेर बेड्या

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार पारनेर इथे समोर आलेला असून भरधाव वेगाने कार घराच्या ओट्यावर चढवली आणि त्यानंतर मायलेकाला चिरडून मारले. आरोपीने त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव निर्माण केला मात्र हा अपघात नव्हे तर पद्धतशीरपणे करण्यात आलेला खून आहे असा आरोप करत मयत महिलेच्या सासूने पारनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पारनेर शहरातील कुंभार गल्ली येथील ही घटना असून मयत शीतल येणारे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे . गुरुवारी संध्याकाळी 27 वर्षीय शितल या त्यांचा मुलगा अडीच वर्षांचा मुलगा स्वराज याच्यासोबत घराच्या ओट्यावर असताना भरधाव वेगाने एक फोक्सवॅगन कार आली आणि तिने शितल आणि स्वराज यांना चिरडले.

प्राथमिक माहितीनुसार हा अपघात वाटत असावा अशी परिस्थिती होती त्यानंतर पारनेर पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्यावर गुन्हा देखील नोंदवलेला होता . परिसरातील तरुणांनी कार बाजूला काढून दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला. आरोपी आणि मयत महिला शेजारी शेजारी राहिला असून जागेच्या वादातून किरण याने हा प्रकार केल्याचे मयत महिला यांच्या सासुने पारनेर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने आरोपीस अटक केलेली आहे .


शेअर करा