डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई , तब्बल इतक्या वासरांची सुटका

शेअर करा

(प्रतिनिधी): दि. 25/11/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की ममदापूर शिवारात तालुका राहाता येथील अनिल उंडे यांच्या शेतजमिनीत एका पांढरे रंगाचे मॅक्स पिकअप गाडीमध्ये कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे आणले आहेत . त्याबाबत आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असतं सदर शेतामध्ये एक पांढरे रंगाचे पिकअप व त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले ओरडताना मिळून आले . सर्व वासरे अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत टेम्पोत कोंबलेली असल्याचे देखील यावेळी दिसून आले.

गाडीमधील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव सुफियान मेहबूब कुरेशी ( राहणार ममदापूर तालुका राहता ) असे सांगितले. त्याचे ताब्यातील पिकअप वाहनाची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे 32 जनावरे मिळून आली. त्यांचे समोर चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तलीकरिता एकत्र पिकअप वाहनांमध्ये जमा करून ठेवले म्हणून सदर इसमास व पिकप मधील गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण सहा लाख तीस हजार रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .

आरोपीचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 685/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित2015) चे कलम 5(अ).5(क).9(अ)9(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम1960 चे कलम 11(च)(ज) पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे यांचे फिर्यादी वरून लोणी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, dysp संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक शिंदे, , असीर सय्यद, पोलीस नाईक राशिनकर पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल थोरमिसे यांनी केली आहे.


शेअर करा