‘ जादूटोणा ‘ करण्यात साथ देईना म्हणून सुनेला.., पारनेर तालुक्यातील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकले तसेच जादूटोणा सरबत पिण्यास नकार दिल्यानंतर सुनेला मारहाण करून त्रास दिल्याप्रकरणी पती सासू आणि ननंद यांच्यासोबत देवऋषी म्हणून काम करणारी एक महिला हिच्या विरोधात पारनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शुभांगी साईनाथ औटी यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिलेली असून त्यांची सासू सुवर्णा यांचा आजार बरा व्हावा आनंद . भाग्यश्री औटी हिचे लग्न जमावे . घरासाठी भाडेकरु मिळावे यासाठी आपली सासू पती आणि नणंद हे जादूटोणा करत असायचे त्यासाठी ते उषा कळमकर ( राहणार घारगाव कळमकरवाडी श्रीगोंदा ) हिच्याकडून अघोरी उपचार देखील करून घ्यायचे आणि आपल्याला देखील त्या महिलेचे आदेश पाळण्यास सांगत होते असे म्हटलेले आहे .

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार आपण त्यांना उतारे टाकण्यास , सरबत पिण्यास , तुळजापूरच्या देवीचे वारे अंगावर घेण्यास नकार दिला म्हणून आपणास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. सासू पती आणि नणंद यांनी आपल्याला घराबाहेर देखील हाकलले आणि त्यावेळी त्यांनी राम मंदिर परिसरात आपल्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र , तीन ग्रॅमची अंगठी हिसकावून घेतली असे म्हटले आहे. पारनेर पोलिसांनी त्यानंतर सुवर्णा औटी , साईनाथ औटी , भाग्यश्री औटी आणि देवऋषी महिला उषा कळमकर यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा