निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला ‘ ब्रेन स्ट्रोक ‘, रत्नागिरीतली जागा धार्जिन नाही सांगत..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नवी मुंबईत समोर आलेला असून तंत्र मंत्र आणि जादूटोणाच्या बहाण्याने पैशाचा पाऊस पाडतो आणि जमिनीखालून खजिना काढतो असे सांगत तुमच्या पतीवर करणी केलेली आहे असे सांगत एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून तब्बल 42 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 36 लाख रुपयांची रक्कम लुबाडण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यानंतर भोंदू बाबा आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 62 वर्षीय तक्रारदार असलेले पवार हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे . पत्नीसोबत ते नवी मुंबईतील वाशी इथे राहायला असून त्यांची मुलगी ही पतीसोबत कामोठे येथे राहायला आहे. पवार यांनी रत्नागिरीत नवीन घर घेतले असून गेल्या आठ महिन्यांपासून ते पत्नीसोबत रत्नागिरीच्या कोकणच्या निसर्गात राहत होते. घरामध्ये पत्नी एकट्याच असायचा याचा फायदा घेत या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलेश हातवळणे उर्फ गुरुजी याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि दुसरे आरोपी सागर जेजुरकर , अर्चना हातवळणे , विजय बाबीर, नानाभाऊ , भक्ती आणि अनुसया कांबळे या सर्वांनी पवार यांच्या पत्नीला जादूटोणा तंत्र मंत्र आणि काळी जादू करणे या संदर्भात आपल्या बोलण्याने प्रभावित केले .

आरोपींनी त्यानंतर तिच्याकडून 42 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 36 लाख रुपये किमतीची रक्कम वेगवेगळ्या प्रकारातून काढून घेतली. दरम्यानच्या काळात मागील महिन्यात पवार यांना रत्नागिरीत ब्रेन स्ट्रोक झाला आणि त्यानंतर पॅरालिसिस झाला. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेले होते त्यावेळी पवार यांच्या मुलीने तिथे जाऊन पाहणी केली तेव्हा तिथे काळी जादू , हळद-कुंकू , सुया टोचलेल्या आढळून आल्या. काळ्या जादूचा हा प्रकार समोर आल्यानंतर पवार यांच्या पत्नीच्या वहीत देखील अशाच स्वरूपाचे कागद आढळून आले.

निलेश हातवळणे आणि वरील सर्व सात आरोपींनी पवार यांच्या पत्नी यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांच्याकडून हा सर्व ही सर्व संपत्ती लुबाडली असे असा आरोप फिर्यादी यांच्या मुलीने केलेला आहे. आरोपी निलेश याने पवार यांच्या रुग्णालयात आढळून आलेली वही घेण्यासाठी देखील दमदाटी केली. मुलीने आणि जावयाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ देखील केली.

पवार यांच्या पत्नीवर सध्या पूर्णपणे या भोंदू बाबाचा प्रभाव असून आपल्या नवऱ्याचा लवकरच मृत्यू होणार आहे असे पवार यांनी त्यांच्या पत्नीला पाण्यात दाखवलेले होते असे देखील पत्नीचे म्हणणे आहे . पोलिसांनी त्यानंतर आरोपी भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक , महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष आणि अनिष्ट प्रथा जादूटोणा यासंदर्भात गुन्हा आरोपींवर नोंदवलेला आहे.


शेअर करा