सरकारी नोकरी मिळताच किडनॅप करून लावलं तरुणाचं लग्न

शेअर करा

सरकारी नोकरी मिळाल्यानंतर लग्नासाठी मोठी मोठी स्थळे चालून येतात मात्र बिहारमधील पाटणा इथे एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका तरुण शिक्षकाचे अपहरण करून चक्क त्याचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बिहार लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेत गौतम कुमार नावाचा व्यक्ती पास झालेला होता . 29 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास चार ते पाच जण त्याच्या शाळेत आले आणि त्यांनी गौतम याला जबरदस्तीने पकडून पकडून नेले . बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करत्या व्यक्तींनी त्यांच्या मुलीचे गौतम सोबत लग्न लावून दिले. विशेष म्हणजे बिहारमध्ये ‘ पकडवा विवाह ‘ अशी एक प्रथा असून त्यामध्ये वराचे अपहरण करून लग्न लावण्यात येते .

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हे प्रकरण असून गौतम कुमार हा पाठेपूरच्या एका माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्त झालेला आहे . गौतम कुमार याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याचा विवाह लावून देण्यात आला . पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे. चांदणी असे जिच्यासोबत लग्न लावले त्या मुलीचे नाव असल्याची माहिती आहे.


शेअर करा