महाराष्ट्रात एक खळबळ जनक अशी घटना 2018 मध्ये घडलेली होती . प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. उपलब्ध माहितीनुसार , रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी ( वय 25 ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून एक जुलै 2018 रोजी हा प्रकार घडला होता. मयत तरुणी ही लक्ष्मीनगर इथे मामाच्या घरी राहत होती. आरोपी सोबत तिचे प्रेमसंबंध जुळले मात्र ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी रोहित याने आपल्यासोबत प्रेमसंबंध कायम ठेव असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती सुरू केलेली होती. त्याच्या स्वभावाला कंटाळून तिने अखेर त्याच्याशी संपर्क देखील तोडून टाकला. तरुणी लक्ष्मीनगर इथे तिच्या मामाकडे राहायला होती त्यावेळी आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीच्या मामीला एकदा भेटण्याची विनंती केली. मामीने स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर इमारतीच्या मागे असलेल्या मामाच्या कार्यालयात रोहित गेला आणि मामाला तिला एकदा भेटण्याची विनंती केली . मामी सोबत तरुणी भेटायला आली त्यावेळी आरोपी रोहित याने कट्यारीने वार करत तिचा खून केला. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने तरुणीचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्याच दिवशी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.