मैत्रिणीसाठी ‘ पुरुष ‘ बनली पण मैत्रिणीने नकार दिला अन.. 

शेअर करा

देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून तामिळनाडूची राजधानी असलेल्या एका व्यक्तीने लिंग बदल केल्यानंतर आपली सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली मैत्रीण हिला जिवंत जाळून टाकलेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक केलेली असून त्याने म्हटल्याप्रमाणे मैत्रिणी सोबत लग्न करण्यासाठी आपण लिंग बदल शस्त्रक्रिया केली मात्र त्यानंतर तिने लग्नाला नकार दिला म्हणून आपण तिची हत्या केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , वेटरीमारण असे आरोपीचे नाव असून लिंग बदल करण्यापूर्वी तिचे नाव पंडी माहेश्वरी असे होते..पंडी माहेश्वरी आणि मयत आर नंदिनी या दोघी शालेय मैत्रिणी होत्या मात्र पुढे वय वाढत गेल्यानंतर महेश्वरी हिचे नंदिनी सोबत प्रेमप्रकरण सुरू झाले. नोकरीसाठी दोघीही चेन्नई इथे दाखल झाल्या आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असायच्या. 

महेश्वरी हिने नंदिनी सोबत लग्न करण्यासाठी लिंग बदल करत शस्त्रक्रिया करून घेतली आणि स्वतः स्त्रीत्व सोडत पुरुष बनल्यानंतर तिने स्वतःचे नाव बदलत वेटरी मारण असे नाव देखील धारण केले मात्र त्यानंतर 25 वर्षीय असलेली नंदिनी हिने त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला त्यामुळे वेटरी मारण याने नंदिनीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिची जिवंत जाळून हत्या केली. 

आरोपीने भेटवस्तू देण्याच्या नावाखाली नंदिनीचे डोळे पट्टीने बांधले आणि त्यानंतर तिला साखळीने बांधले आणि तिला जिवंत पेटवून दिले. जीवाच्या आकांताने नंदिनी ओरडत होती मात्र तिचा आवाज कुणापर्यंतच पोहोचला नाही आणि अखेर तिने प्राण गमावले . माहेश्वरी हिने लिंग बदल केल्यानंतर देखील नंदिनीने मानवी आधारावर माहेश्वरी सोबत मैत्री ठेवलेली होती मात्र लग्न करण्यापर्यंत तिची तयारी नव्हती त्यातून आरोपीने हा प्रकार केला असे म्हटलेले आहे. 


शेअर करा