अखेर ‘ गुड न्यूज ‘ आली , सीमा हैदरने त्या प्रश्नाला उत्तर दिलंच

शेअर करा

ऑनलाईन गेम खेळत असताना प्रियकराच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर ही तिच्या चार मुलांसह भारतात आली आणि त्यानंतर तिने सचिन नावाच्या प्रियकरासाठी धर्मांतर देखील केले . सचिन आणि सीमा हैदर यांची प्रेम कहानी सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आली त्यानंतर सिमा ही प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या. काही महिन्यांपूर्वी सीमाने असे काही नसल्याचे सांगितले होते मात्र अखेर सीमा हैदर गर्भवती असल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे . सीमा आणि सचिन यांच्या चाहत्यांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. 

एका मुलाखतीमध्ये सचिन आणि कुटुंबीयांसोबत बोलताना सीमा हीने ती गर्भवती असल्याची माहिती दिलेली असून आता एक मुलगा होईल असे म्हटलेले आहे . पत्रकाराने तिला सीमा साठी नवीन वर्ष आनंद घेऊन येणार आहे का ? असा प्रश्न विचारला होता त्यावेळी तिने 2023 सुद्धा खूप आनंद घेऊन हे वर्ष आलेले होते तसेच 2024 देखीलआनंदात जाईल असे म्हटलेले आहे . सचिनचा वाढदिवस देखील जवळ आलेला असून त्याच दिवशी कोणाचा तरी जन्म होईल असे देखील तिने संकेत दिलेले आहेत. 

सीमा हिची डिलिव्हरीची तारीख यासंदर्भात देखील तिला पत्रकाराने विचारले त्या व्यक्तीने थोडी वाट पहा असे म्हटलेले आहे . सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची देखील चर्चा सुरू असून त्या अनुषंगाने सध्या विविध शासकीय यंत्रणांकडून तिचा तिची चौकशी देखील सुरू आहे . आपण धर्मांतर केलेले आहे आणि आता भारतातच राहणार आहोत असे देखील तिने सांगितलेले आहे . 

दुसरीकडे तिचा आधीचा पती याने चक्क पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांना याप्रकरणी तोडगा काढण्याचे सांगितलेले आहे . सीमा हिला आपण पाकिस्तानमध्ये परत आली तर स्वीकारू असे देखील त्याने म्हटलेले आहे तर दुसरीकडे सीमाही भारतात राहण्यावर ठाम आहे. 


शेअर करा