वेश्याव्यवसाय प्रकरणात ‘ तो ‘ देखील आरोपी ठरतो ,  उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

शेअर करा

न्यायालयाचे काही निर्णय हे चांगलेच चर्चेत येत असतात . असाच एक निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिलेला असून वेश्यागृहातील ग्राहकाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत खटल्यात आरोपी केली जाऊ शकते असे म्हटलेले आहे. 

देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकरणात छापा टाकल्यानंतर लॉज मालक तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या महिला तसेच आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात मात्र ग्राहक म्हणून आलेले व्यक्ती अनेकदा या कचाट्यातून सुटतात मात्र असाच एक ग्राहक कुंटणखान्यात आढळून आला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात कलम तीन वेश्यालय चालवणे , कलम चार वेश्येच्या व्यवसायाच्या कमाईवर जगणे , कलम 5 महिलेची खरेदी आणि कलम सात सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय या कलमाअंतर्गत आरोपी केलेले होते. 

आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार , आरोपीने अनैतिक वाहतूक कायदा अंतर्गत तीन चार आणि सातमध्ये नमूद वेश्याव्यवसायाचा गुन्हा केलेला नाही तो केवळ त्या ठिकाणी ग्राहक म्हणून पोहोचलेला होता त्यामुळे कलम पाच मध्ये तो अपराधी ठरत नाही ‘ असा युक्तिवाद केलेला होता. 

हायकोर्टाने या प्रकरणी निरीक्षण नोंदवताना अनैतिक वाहतूक कायद्याचे कलम पाच मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची खरेदी करणे हा अपराध आहे तथापि हा कायदा खरेदी करणे या शब्दाची व्याख्या करत नाही त्यामुळे खरेदी करणे हा शब्द ज्या संदर्भात वापरलेला आहे तो समजून घेणे आवश्यक आहे . हायकोर्टाने जरी  त्याला तीन चार आणि सात मधून मुक्त केलेले आहे मात्र त्याच्या विरोधातील कलम पाचचा खटला रद्द करण्याची विनंती स्पष्ट शब्दात फेटाळून लावलेली आहे . जो कोणी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने मिळवतो तो अनैतिक वाहतूक कायद्याच्या कलम पाच मध्ये येतो असे न्यायालयाने यावेळी म्हटलेले आहे. 


शेअर करा