अखेर ठरलं … ‘ ह्या ‘ तारखेला भाजपला रामराम करून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल होणार

शेअर करा

‘ कधी तळ्यात कधी मळ्यात ‘अशा स्वरूपात राजकीय भूमिका राहिलेल्या एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळालेला असून त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. न्यूज १८ लोकमत मराठीने याबद्दल वृत्त दिले असून एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमत मराठीने दिले आहे . Eknath Khadse will leave BJP and join NCP on October 22

एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे हे निश्चित आहेच पण खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे.भाजप राज्यात ज्यांनी वाढवली आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्यांनी भाजपला जनाधार मिळवून दिला अशा नेत्याने पक्ष सोडल्याने समाजात भाजपबद्दल नकारात्मक मेसेज जाईल ही गोष्ट वेगळी.

एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबरला 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते.

राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहेच आता फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजपचे कधी न भरून येणारे नुकसान होणार आहे. भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याची उदाहरणे फारशी नाहीत मात्र भाजपचा एककल्ली कारभार आणि केवळ निवडक उद्योजकांचे हित जोपासण्याची नीती पाहता येत्या काळात भाजपला आणखी काही धक्के सहन करावे लागण्याची जास्त शक्यता आहे .

एकनाथ खडसे यांची कन्या रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे मात्र तरीदेखील एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील आणि भाजपाला गुडबाय करतील अशी चिन्हे जास्त आहेत .


शेअर करा