प्रेयसीचा ‘ रॉंग नंबर ‘ , भलत्याच तरुणासाठी घेतली पाण्यात उडी आणि.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून कल्याण पूर्व येथील ही घटना आहे . नांदिवली परिसरात एका तरुणाने  तलावात उडी मारली हे समजल्यानंतर एका तरुणीचा आपल्या प्रियकराने तलावात उडी मारली असा गैरसमज झाला आणि तिने देखील त्यानंतर तलावात उडी मारली मात्र तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिचा जीव वाचवला आणि त्यानंतर तरुणीने ‘ ज्याने उडी मारली तो माझा प्रियकर आहे ‘ असे सांगत मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली . 

अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ तिथे दाखल होऊन तलावात ज्याने उडी मारली होती त्या तरुणाला बाहेर काढले मात्र त्याचवेळी तरुणीचा प्रियकर देखील तिच्यासमोर आला आणि तिचा मोठा गैरसमज दूर झाला . ज्या तरुणाला तलावाबाहेर काढण्यात आलेले होते त्याचा या घटनेत मृत्यू झालेला असून तरुणीच्या चेहऱ्यावर जरी हसू आले तरी जो मृतदेह बाहेर काढण्यात आला तो पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा होता 

महेश भाटिया असे मयत तरुणाचे नाव असून होण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली होती मात्र त्याला त्याचा अंदाज आला नाही म्हणून तो पाण्यात बुडाला अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला . तरुणीच्या मनात भलतीस शंका आली त्यामुळे तिने देखील तलावात उडी घेतलेली होती मात्र तरुणीला वाचवण्यात आले असून शुभम शेटे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


शेअर करा