‘ कोणाशी बोलतेस ? ‘ ,  संशय आल्यानंतर घडलं खळबळजनक हत्याकांड

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरात समोर आलेले असून आपली प्रेयसी दुसऱ्या कोणासोबत तरी मोबाईलवर चॅटिंग करते याचा राग आल्यानंतर संतप्त झालेल्या प्रियकराने तिचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केलेला आहे. 22 तारखेला मध्यरात्री हा प्रकार घडला त्यानंतर आरोपी याने मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह देखील रासबिहारी लिंक रोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला. आरोपीस पंचवटी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , प्रियंका वीरजी वसावे ( वय 19 वर्ष राहणार पाटबारा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार ) असे मयत तरुणीचे नाव असून या प्रकरणात पोलिसांनी सागर शिवदास तडवी (वय 21 वर्ष नंदुरबार सध्या राहणार अंबड ) याला अटक केलेली आहे. 

प्रियंका ही एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेत होती. आरोपी आणि प्रियंका यांची पूर्वी मैत्री होती आणि मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अंबड इथे प्रियंका आरोपीच्या घरी गेली त्यानंतर रात्री एकच्या सुमारास प्रियंका कुणासोबत तरी मोबाईलवर चॅटिंग करते आहे असा आरोपीला संशय आला आणि त्यानंतर त्याने तिचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाला हे लक्षात आल्यानंतर आरोपी घाबरून गेला आणि त्याने त्याच्या मित्राला फोन केला. 

दोन्ही आरोपींनी त्यानंतर तिचा मृतदेह दुचाकीवरून रासबिहारी लिंक रोडवरील एका मोकळ्या जागेत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास एका नागरिकाला हा मृतदेह आढळून आला त्यानंतर हे प्रकरण समोर आले. पंचवटी पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. आरोपी सागर याने मित्राला फोन करून तिने आत्महत्या केलेली आहे अशी माहिती दिली असल्याचे देखील समोर आलेले आहे . 


शेअर करा