रात्री एक वाजता अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार , पाथर्डीतील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळ जनक असा प्रकार समोर आलेला असून पाथर्डी तालुक्यातील एका गावात एका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने पळवून घेऊन जात अत्याचार केलेला आहे . सदर प्रकारात त्याला आणखीन एका व्यक्तीने मदत केलेली असून सोमवारी रात्रीची ही घटना आहे

उपलब्ध माहितीनुसार , संदीप तागड आणि योगेश हटकर अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  पीडित मुलगी ही दहावीत शिकत असून 29 जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास आरोपी संदीप तागड याने  तिला घराबाहेर चार चाकी घेऊन येत फोन केला आणि त्याच्यासोबत दुसरा आरोपी योगेश हटकर हा देखील होता. 

दोन्ही आरोपींनी बळजबरीने तिला गाडीत बसवले आणि त्यावेळी योगेश हटकर हा गाडी चालवत होता. चिचोंडी येथे गाडी आल्यानंतर योगेश हटकर तिथून निघून गेला आणि त्यानंतर संदीप तागड याने मुलीला शाळेत घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि तागड याने त्यानंतर तिला तिच्या गावात आणून सोडले. मुलीचे आई-वडील तिचा शोध घेत होते हे लक्षात येताच तागड याने गाडी सोडून तिथून पलायन केले. अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दिलेली असून तक्रार दाखल झाल्याचे समजताच दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत. त्यांच्या विरोधात पोक्सो , बलात्कार तसेच धमकी देणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा