भाजपच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा , चार वेळा गर्भपात केला असल्याचे..  

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना कल्याणमध्ये समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजपचा माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , कल्याण पूर्व भागात राहणारे मनोज राजे बिल्डर असून त्यांनी एका चाळीस वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत स्वतःच्या राहत्या घरी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले . महिलेला दिवस गेले त्यानंतर चारही वेळा त्याने तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले.  महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला त्यावेळी त्याने तिला मारहाण करून लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. 

पीडित महिलेने त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिलेली असून पोलिसांनी राय याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार आरोपीने आपले अनेकदा लैंगिक शोषण केले असून लग्नाचे आमिष दाखवलेले होते म्हणून आपण त्याच्यासोबत शारीरिक संबंधास संमती दिली असे म्हटलेले आहे. 

आरोपी मनोज राय याने मात्र हे आरोप फेटाळले असून आरोपी महिला आपल्याला ओळखते . मालमत्ता विकसित झाल्यानंतर आपण तिला मोबदला देखील दिलेला आहे मात्र अतिरिक्त मोबदला द्यावा अशी तिची मागणी होती म्हणून तिने खोट्या केसेस मध्ये अडकवण्याची धमकी दिली . माझ्या विरोधात तक्रार केली तर त्याबाबत खात्री करावी आणि त्यानंतरच कायदेशीर कारवाई करावी असे देखील मनोज राय यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा