मराठा समाजाचे देखील काही जळणारे नेते , मनोज जरांगे पाटील म्हणाले की.. 

शेअर करा

मराठा आरक्षणाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी , ‘ मराठा आरक्षण विषयापासून मला बाजूला करण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत मात्र माझे करोडो मराठा बांधव जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी बाजूला हटणार नाही . क्रेडिट घेण्यासाठी काहीजण विनाकारण मध्ये घुसायला लागलेले आहेत . मराठा समाजाचे देखील काही जळणारे नेते आहेत ,’  असे म्हटलेले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते म्हणाले की, ‘ सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले लोक जाणीवपूर्वक बोलत आहेत मात्र ते जर गप्प बसले नाहीत तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह त्यांची नावे देखील जाहीर करेन . 10 फेब्रुवारीपासून आपले उपोषण पुन्हा सुरू होणार आहे , ‘ अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. 

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की , ‘ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील काही नेत्यांनी माझ्या विरोधात बोलण्याची सुपारी घेतलेली आहे . महाराष्ट्रातील काही दहा वीस जण सतत बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळाले काही नाही मिळाले हे सोशल मीडियावर विचारत असतात मात्र हा लढा त्यांच्यासाठी नाही तर माझ्या मराठा समाजासाठी आहे. मी कुठेही बसलो तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीतआड  दुसरे काही करायचे असते तर मी मागच्या दारातून गेलो असतो , लोकांमध्ये कशाला आलो असतो ‘, असे देखील ते म्हणाले.


शेअर करा