महाराष्ट्र हादरला , त्याच्यावर पॉक्सो अन ‘ ती ‘ तिच्या घरी पण..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण नांदेड जिल्ह्यात समोर आलेले असून प्रेमसंबंधावरून जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या सतरा वर्षीय मुलीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायत नगर शहरात नेहरु नगर येथे ही घटना समोर आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अंकिता रामराव पवार ( वय 17 वर्षे ) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून अंकिता हिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते . काही दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत पळून देखील गेली मात्र घरच्यांनी तिचा शोध घेऊन पुन्हा तिला घरी आणलेले होते . मुलगा दुसऱ्या जातीतील असल्या कारणाने आपली बदनामी होत असल्याचा राग आई-वडिलांच्या मनात खदखदत होता. 

अंकिता हिला मारहाण करत असताना तिच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराचे वार झाले त्यात तिचा मृत्यू झाला . खून लपवण्यासाठी त्यास आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले मात्र शंका उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला त्यात मुलीच्या डोक्याला आणि इतर शरीरावर इतर ठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचे समोर आले . मुलीला समजावून सांगून ती ऐकत नसल्याने आई-वडिलांनी गुरुवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना तिची हत्या केली हे समोर आलेले आहे . 

वडील रामराव मारुती पवार , आई पंचफुला रामराव पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी प्रियकरावर एक महिन्यापूर्वीच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अंकिता ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेलेली होती त्यामुळे कुटुंबीयांची बदनामी झाली म्हणून प्रियकरावर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर अंकिता हिला देखील कुटुंबीय घरी घेऊन आले होते मात्र ती प्रियकरासोबत राहण्याचा आग्रह करत असल्याकारणाने आई-वडिलांनीच तिची अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे. 


शेअर करा