मी पोलीस आहे बॅग दाखवा , लग्नाला आलेल्या जोडप्याला हेरलं अन.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार श्रीरामपूर येथे समोर आलेला असून आपण पोलीस आहोत असा बहाना करत एका जोडप्याचे 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र घेऊन एक भामटा फरार झालेला आहे . श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथे ही घटना 30 तारखेला घडलेली आहे . 

उपलब्ध माहितीनुसार , पुंडलिक बाबा गवांदे ( राहणार भालगाव तालुका वैजापूर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ते श्रीरामपूर येथे एका लग्न सोहळ्यासाठी आलेले होते . उंदीरगाव येथील बर्डे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या पाठीमागून एक मोटर सायकल आली आणि त्या व्यक्तीने मी पोलीस आहे . साहेबांनी मला अवैध दारू आणि गुटख्या विरोधात कारवाईचे आदेश दिलेले आहे तुमची बॅग दाखवा , असे म्हणत त्याने फिर्यादी यांच्या खिशातील तंबाखूचा बटवा काढून घेतला. 

त्यांच्यासोबत असलेल्या उषाबाई गवांदे यांना आरोपींनी पुढे चोरटे आहेत तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाका असे देखील समोरील व्यक्ती म्हणाला आणि त्यानंतर उषाबाई यांनी मंगळसूत्र बॅगेत टाकले. आरोपीने बॅग तपासणी केली आणि तो निघून गेला त्यानंतर माळेवाडी इथे एका दुकानात फिर्यादी यांनी बॅग उघडली त्यावेळी मंगळसूत्र गायब झालेले होते . श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा