अधिकाऱ्याला कोंडून ठोकलं कुलूप , जनआधार सामाजिक संघटना आक्रमक

शेअर करा

नगर शहरातून जाणाऱ्या स्टेट बँक चौकापासून भिंगार शहापूर रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून रखडलेले असून मोठ्या प्रमाणात या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता दी. ना . तारडे यांच्या कार्यालयावर चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर पंधरा दिवसात रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे देखील घेण्यात आलेले होते. 

आंदोलन मागे घेतल्यानंतर दोन महिने उलटले तरी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही . 2 फेब्रुवारी रोजी सुनील बेरड नावाच्या शिक्षकाचा देखील अपघाती मृत्यू झालेला होता आणि यापूर्वी याच ठिकाणी बापलेकांचा वर्षभराच्या अंतराने अपघाती मृत्यू झाला मात्र तरीदेखील खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने उपविभागीय अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 

जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश पोटे यांच्या समवेत उपाध्यक्ष दिलीप गुगळे सचिव अमित गांधी , शहराध्यक्ष शहनवाज शेख , युवक शहराध्यक्ष शहाबाज शेख , सचिन फल्ले यांच्या सोबत अनेक आंदोलन करते वेळी उपस्थित होते . उपविभागीय अभियंता दि. ना. तारडे यांना आत मध्ये कोंडून कार्यालयास टाळे मारण्यात आले . पुढील पंधरा दिवसात काम सुरू झाले नाही तर राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता कार्यालय रेल्वे स्टेशन येथे एकाही अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये आम्ही बसू देणार नाही असे देखील आंदोलकांनी ठणकावले आहे. 


शेअर करा