मृतदेहाचं बनवलं आधार कार्ड ,  चौथ्या लग्नासाठी वकिलाचा प्लॅन पण..

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून तिसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून बावीस वर्षीय प्रेयसी सोबत चौथे लग्न करून तिच्याच आई-वडिलांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यासाठी बेवारस मृतदेहाचे आधार कार्ड बनवून त्यांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आरोपी व्यक्ती हा वकील असून हेतराम मित्तल असे त्याचे नाव आहे. त्याची प्रेयसी मुस्कान आणि इतर जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आरोपीने शवागारात सापडलेला मृतदेह अतुलकुमार नावाच्या व्यक्तीचा असून तो मुस्कानचा पती आहे असे सांगितले आणि अज्ञात मृतदेहालाच प्रेयसीचा नवरा सिद्ध करण्यासाठी मृतदेहाचे बनावट आधार कार्ड देखील बनवले. उत्तर प्रदेशातील इटावा येथील हे प्रकरण आहे.

इतक्यावरच प्रकरण थांबले नाही तर अतुलकुमार याला मुस्कानच्याच आई-वडिलांनी मारले असा देखील दावा करत त्याने अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले आणि मुस्कानच्या आईवडिलांना तुरुंगात पाठवण्याचा त्याचा प्लॅन होता मात्र मृत व्यक्तीच्या खऱ्या कुटुंबीयांना माहिती समजली अन वकिलाची योजना फसली . प्रेयसी सोबत त्याला अटक करण्यात आलेली आहे. भादंवि 34, 193, 419, 467, 468, 471 प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . 


शेअर करा