मुलगा पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये दे ,  नगर शहरातील प्रकार

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आईसमोरच एका पंधरा वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवत त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर 50 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली असा प्रकार केडगाव परिसरात समोर आलेला आहे. सात जणांच्या विरोधात कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आजिनाथ काळे , जावेद अजिनाथ काळे , जानी देवल अजिनाथ काळे, जामीन अजितनाथ काळे , आकेश आजिनाथ काळे , अली भोसले अशी आरोपी व्यक्तींची नावे असून ताई सुरेश काळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वरील सर्व आरोपींनी फिर्यादी महिला यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला आणि त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना घराच्या बाहेर काढले. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या मुलाला बळजबरीने दुचाकीवर बसवले आणि मुलगा परत पाहिजे असेल तर गुपचूप 50 हजार रुपये दे असे म्हणत मुलाला किडनॅप केले असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. 


शेअर करा