डॉक्टरने महिलेच्या बदनामीची छापली पत्रके ? , महिलेचा नवरा आला अन.. 

शेअर करा

नाशिक शहरातील डॉक्टर कैलास राठी यांच्यावर 18 वार करत मारण्याचा प्रयत्न केलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आलेला असून घटनेमागचे कारण अखेर समोर आलेले आहे . काही अतिउत्साही डॉक्टर संघटनांनी तात्काळ रुग्णालय आणि नाशिक रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र कारण समोर येताच हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राजेंद्र मोरे ( वय ३७ राहणार नाशिक ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे . आरोपी डॉक्टरने पत्नीची बदनामी केल्याचा संशयातून आपण हा हल्ला केला असे त्याने पोलिसांना सांगितले आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार , आपल्या घराजवळ आणि सध्या पत्नी नोकरी करत असलेल्या परिसरात तिची बदनामी करणारे पत्रक छापून अज्ञात लोकांनी ते वाटले होते. 

सदर बदनामी पाठीमागे डॉक्टर कैलास राठी हा असल्याचा आपला संशय होता . हल्लेखोर मोरे याची पत्नी डॉक्टर राठी यांच्या सुयोग हॉस्पिटलमध्ये काही वर्षांपूर्वी नोकरीला होती त्यावेळी तिने काही अपहार केला म्हणून डॉक्टरांनी तिला काढून टाकलेले होते मात्र दोन वर्षांपूर्वी पुन्हा तिला डॉक्टरांनी खाजगी कामासाठी म्हणून नोकरीवर रुजू करून घेतले मात्र त्यात देखील पुन्हा गडबड झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी राजेंद्र मोरे आणि त्याची पत्नी यांना समोर बोलावून आपण अपहार केलेल्या रकमेची मागणी केलेली होती. 

दुसरीकडे राजेंद्र मोरे यांनी आरोपी डॉक्टर यांनी आपल्या पत्नीची बदनामी केली त्यावरून आपण हा हल्ला केलेला आहे असे देखील पोलिसांना सांगितले आहे . सदर प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. 


शेअर करा