नगरच्या राजकुमाराला प्रसिद्धीचा सोस आवरेना , प्रसिद्धीसाठीचे ‘ टेक्निक ‘ कल्पनेपलीकडचे

शेअर करा

अक्षरश: कोंबड्या झाकाव्यात तसे शहरातील लोकप्रतिनिधीचे फ्लेक्स आणि बोर्ड महापालिकेने झाकल्यानंतर देखील जाहिरातबहाद्दरांच्या प्रसिद्धीच्या सोसाला कुठलाही लगाम अद्यापपर्यंत  लागलेला नाही. जुन्या काळात केलेल्या किरकोळ कामांची क्रेडिट घेऊन आपल्याच चार पंटरच्या माध्यमातून सत्कार करून घेत त्या बातम्या माध्यमात छापून आणण्याचा मोह सध्या नगरच्या राजकुमाराला पडलेला आहे. 

नगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा ही काही नवीन बाब नाही. जो काही विकास निधी आणला तो आपल्याच पंटरच्या प्रभागातील रस्त्यांसाठी खर्च केला आणि ज्या रस्त्यावर हजारो नागरिक रोज ये जा करतात त्या रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामाला देखील आज महापालिकेकडे पैसे नाहीत.  मनपाने टेंडर काढून देखील ठेकेदारांनी महापालिकेच्या टेंडरकडे पाठ फिरवलेली आहे त्या पाठीमागे बिलांची रक्कम देण्यासाठी लागणारा कालावधी सोबतच कथित टक्केवारी हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वीच शहरात ठिकठिकाणी फ्लेक्सचा धिंगाणा करून आणि पेपरमध्ये फुल स्क्रीन जाहिराती देऊन या राजकुमाराने जो काही चमकोपना केला तो नगरकरांच्या अजूनही लक्षात आहे. शक्य त्या कोपऱ्यावर स्वतःच्या किरकोळ कामाची मोठी जाहिरात रंगवून तिचे उद्घाटन घडून आणायचे आणि त्याच्या बातम्या छापून आणायच्या असे प्रकार आचारसंहितेपूर्वी नित्याचे झालेले होते. 

आचारसंहिता लागल्यानंतर देखील प्रसिद्धीचा सोस कमी होत नसल्याने तसेच आज रोजी प्रसिद्धीचा फोकस हा एकेकाळचे आपले विरोधक असलेल्या व्यक्तीवरच जाऊ नये म्हणून स्वतःच्याच मर्जीतल्या चार लोकांना हाताशी धरून सत्कार सोहळ्यांचे तसेच वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन सुरू आहे.  मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी आचारसंहितेचे उल्लंघन करत असे प्रकार सध्या शहरात सुरू असून निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.  


शेअर करा