अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या शिंदे गटात , कंगनाच्या विरोधात आता कोण ?

शेअर करा

भाजपची मुख्य विरोधक असलेल्या इंडिया आघाडीला एक झटका बसलेला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी इथून कंगना राणावत निवडणूक लढवणार असून इंडिया आघाडीकडून तिच्या विरोधात सिने अभिनेता गोविंदा याला लोकसभेचे तिकीट देण्यासंदर्भात चर्चा रंगलेली होती. इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर ट्विटर हँडलवर देखील या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला होता मात्र अभिनेता गोविंदा अचानकपणे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलेला असून एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचे पक्षात स्वागत केले . गोविंदा निवडणूक लढवणार की नाही याविषयी मात्र प्रश्नचिन्ह असून मंडी लोकसभा मतदारसंघात आता नवीन उमेदवाराचा शोध इंडिया आघाडीला घ्यावा लागणार आहे. 

अभिनेता गोविंदा याने काही वर्षांपूर्वी दिग्गज भाजप नेते राम कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यात यश देखील मिळवलेले होते मात्र त्यानंतर गोविंदाचा राजकारणाशी संबंध कमी झाला. ‘ गोविंदा दाखवा आणि रोख रक्कम मिळवा ‘  असे पोस्टर देखील गोविंदाच्या मतदारसंघात लागलेले होते त्यानंतर गोविंदाने राजकारणापासून चार हात लांब राहणे पसंत केले. गोविंदा शिवसेनेत दाखल झालेला असला तरी निवडणूक लढवणार की नाही याविषयी मात्र अद्यापपर्यंत संभ्रम आहे.


शेअर करा