‘ पडद्यावरचा राजाबाबू आणि खराखुरा राजाबाबू दोन्हीही एनडीएमध्ये ‘

शेअर करा

सिने अभिनेता गोविंदा याने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर गोविंदाच्या राजाबाबू चित्रपटाची पुन्हा चर्चा सुरू झालेली असून ‘ आता पडद्यावरचा राजाबाबू आणि खराखुरा राजाबाबू दोन्ही एनडीएत आहेत ‘ अशी खोचक पोस्ट एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेली आहे . 

राजाबाबू चित्रपटातील गोविंदाचे पात्र हे कुठलाही कामधंदा न करता वडिलांच्या पैशावर केवळ ऐश करत असायचा आणि आईचा अत्यंत लाडका लाडका होता. गोविंदा आणि करिष्मा कपूर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच यशस्वी झाला मात्र 2014 मध्ये पंतप्रधान मोदींची सत्ता आल्यानंतर मोदी यांची वेगवेगळी वेशभूषा अन परदेशातील दौरे यांचा संदर्भ जोडत त्यांची राजाबाबूसोबत तुलना करण्याचे प्रकार आधी देखील समोर आले आहेत. 

अभिनेता गोविंदा हा शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आणि शिंदे गट सध्या भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेत असल्याकारणाने आता ‘ पडद्यावरचा राजा बाबू आणि खराखुरा राजा बाबू दोन्हीही एनडीएमध्ये आहेत ‘ अशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. नरुन्दर नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आलेली आहे.


शेअर करा