संगमनेर तालुक्यातील ‘ त्या ‘ घटनेत पोलीस निरीक्षकांकडून तपास काढून घेण्याची मागणी

शेअर करा

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलेले होते. सदर प्रकरणी सध्या पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे तपास करत आहेत मात्र त्यांच्याकडील तपास काढून घेऊन घटना मिटवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना व्यक्तींना सह आरोपी करावे अशी मागणी मयत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे केलेली आहे. 

मयत मुलीच्या कुटुंबीयांनी या संदर्भात एक निवेदन दिलेले असून निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ‘ अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने आत्महत्या केलेली आहे. अशाच पद्धतीच्या घटना या आधी देखील परिसरात घडलेल्या आहेत मात्र पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे आरोपी सोकावत आहेत तर विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

आमच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडूनच कुटुंबीयांना झालेला त्रास हा भयंकर आहे त्यामुळे संबंधित व्यक्तींकडून निर्णायक तपास होईल याविषयी आम्ही शाश्वत नाही त्यामुळे त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा . आरोपींनी यापूर्वी देखील मुलीची छेडछाड करून तिला त्रास दिलेला होता मात्र प्रतिष्ठित व्यक्तींनी यावेळी पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ दिले नाही आणि मध्यस्थी करून मिटवले त्यामुळेच आरोपींना पुन्हा हा प्रकार करण्याचे त्यांचे धाडस झाले , ‘ असे म्हणत पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्याकडून हा तपास काढून घेण्याची मागणी केलेली आहे . 


शेअर करा