गृहमंत्र्यांचा पीए आहे सांगत ओळख वाढवली आणि ,  दांपत्याची पोलिसात धाव.. 

शेअर करा

देशभरात सध्या बेरोजगारीचे मोठे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अनेक बेरोजगारांना अनेक तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्याने त्यांची फसवणूक करणारी टोळकी देखील सक्रिय झालेली आहेत असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आलेला असून आपण गृहमंत्र्याचा पीए आहे असे सांगत एका दाम्पत्याला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपयांना लुबाडण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुशील भालचंद्र पाटील ( राहणार पंचवटी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गंगापूर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. फिर्यादी सुभाष चौगुले आणि त्यांच्या पत्नीला नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले आणि त्यानंतर 2022 पासून तर आत्तापर्यंत 35 लाख रुपयांना त्यांना फसवण्यात आले. 

कुठलीही सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून फिर्यादी यांनी आणखीन तपास केला त्यावेळी इतरही अनेक जणांना लुबाडत आरोपीने आतापर्यंत 80 लाख रुपयांना फसवल्याची माहिती समोर आली. पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केलेली असून यापूर्वी देखील त्याच्याच विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे


शेअर करा