नवी नौटंकी..निर्मला सीतारामन म्हणतात निवडणूक लढवायला माझ्याकडे.. 

शेअर करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अजब वक्तव्य केलेले असून त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडिया जोरदार चर्चा आहे. निर्मला सीतारामन यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे म्हणून भाजप नेतृत्वाला निवडणूक लढवण्यास नकार सांगितला असल्याचे वक्तव्य त्यांनी केलेले होते. 

निर्मला सीतारामन यांनी , ‘ भाजपचे अध्यक्ष यांनी आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडूमधून आपल्याला उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नाही. भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला त्यानंतर नकार दिला , ‘ असे म्हटलेले आहे . 


शेअर करा