आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन झाकतयं स्वतःचा निष्क्रियपणा ,  शहरात कचऱ्यांचे ढीग

शेअर करा

सध्या निवडणुकीच्या धामधुमीत कुणाला जनतेच्या प्रश्नाकडे पाहण्यास वेळ राहिलेला नाही .नगर शहरात ठीकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागलेले असून शहरासोबत उपनगरात देखील अशीच परिस्थिती आहे. महापालिकेचा कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात सध्या नागरिकांना भेडसावत असून पाणी लाईट या मूलभूत सुविधासाठी सुविधांसाठी देखील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे . 

उन्हाळा सुरू असल्याकारणाने अनेक घरांमध्ये फॅन आणि एसी सुरू असतात त्यामुळे विजेचा तुटवडा भासतो आणि भारनियमन करण्याची गरज पडते त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कुठल्याही क्षणी विद्युत पुरवठा खंडित होतो आणि कधीही सुरू होतो त्यामुळे विद्युत उपकरणांना देखील धोका निर्माण झालेला आहे. 

एकीकडे विजेचा प्रश्न सुरू असताना दुसरीकडे पाण्याची देखील तशीच परिस्थिती असून शहरात अनेक ठिकाणी पुरेशा दाबाने पाणी येत नाही तर काही ठिकाणी तीन चार दिवस पाणी येत नाही. उन्हाळा सुरू असल्याकारणाने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनालाच वेळच राहिलेला नाही तर लोकप्रतिनिधी देखील आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन आम्हाला दाद देत नाही अशी कारणे पुढे करत आहेत. 


शेअर करा