‘ आमचा घरचा विषय ‘ म्हणत पोलिसांवरच उगारला हात , लष्करी जवानाचे कृत्य

शेअर करा

नगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पती दारू पिऊन मारहाण करत असल्या प्रकरणी तक्रार आल्यानंतर भिंगार पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र सैन्य दलात कार्यरत असलेल्या या जवानाने पोलिसांवरच हल्ला चढवत त्यांना दमदाटी करत त्यांच्यावर हात उगारला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , दामोदर धारूर सानप ( राहणार बारा बाभळी तालुका नगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून काही दिवसांपासून सानप हा रजा घेऊन गावी आलेला आहे . मद्यप्राशन करून तो घरच्यांना सातत्याने सतत त्रास देत असायचा . त्याच्याविरोधात तक्रार आल्यानंतर भिंगार पोलीस मदतीसाठी पोहोचले त्यावेळी त्याने हा प्रकार केला. 

आरोपी हा पत्नीसोबत घरच्या व्यक्तींना तिच्या माहेरच्या व्यक्तींना मारहाण करतो अशी तक्रार आली म्हणून पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते. भिंगार पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संजय काळे आणि हवलदार दिवटे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी सानप याने ‘ आमचा घरचा विषय आहे तुम्ही मध्ये लक्ष देऊ नका ‘ असे म्हणत पोलिसांवरच हात उगारला त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


शेअर करा