‘ केवळ इंग्रजी बोलून पोट भरणार आहे का ? ‘, निलेश लंके म्हणाले की.

शेअर करा

महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांच्यावर शेवगाव इथे निशाणा साधताना सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा त्यांचा अजेंडा असून मागील पन्नास वर्षांपासून जिल्ह्याचे राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांनी इतक्या मोठ्या कालखंडात कोणते काम केले ? केवळ खोटी आश्वासने देऊन लोकांना भुलवण्याची कामे केलेली आहेत , असे म्हटले आहे. 

निलेश लंके म्हणाले की , ‘ कोरोना काळात कुठल्या हे कुठे जाऊन बसलेले होते. रेमडिसीवर इंजेक्शन विमानातून आणल्याचा देखावा तयार केला मात्र प्रत्यक्षात कार्यकर्त्याची तोंडे पाहून ती देण्यात आली आणि बरीच इंजेक्शन तर विकली देखील गेली आणि लसीकरणाचा देखील त्यांनी धंदा केला आणि शासनाचा निधी देखील लाटला. 

मतदार संघातील प्रश्नांची पत्रिका तयार करण्यात येऊन त्यानंतर त्याचे आपल्याला उत्तर पत्रिकेत रूपांतर करायचे आहे. निवडणूक लढवायची असेल तर समोर विशिष्ट उद्दिष्ट हवे. निवडणूक आल्यावर गप्पा मारायच्या हे त्यांचे धोरण आहे आमचे नाही. मतदार संघात मतदार प्रचंड नाराज असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी यांनी व्यक्ति द्वेष सुरू केलेला आहे. शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडणे गरजेचे होते. इंग्रजीची पोपटपंची करणारा खासदार हवा की काम करणारा खासदार हवा . केवळ इंग्रजी बोलून पोट भरणार आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. 


शेअर करा