पारनेरमधील आणखीन एक आर्थिक संस्था अडचणीत , डिसेंबरपासून फक्त.. 

शेअर करा

पारनेरमधील आणखीन एक आर्थिक संस्था अडचणीत

नगर जिल्ह्यात सुमारे डझनभर आर्थिक संस्था अडचणीत असून पारनेरमधील आणखीन एक आर्थिक संस्था अडचणीत आलेली आहे . सेनापती बापट मल्टीस्टेट क्रेडिट कॉ ऑपरेटिव्ह सोसायटीत गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याकारणाने ठेवीदारांनी संस्थेच्या कार्यालयात पारनेर इथे जाऊन ठेवींची रक्कम मिळवण्यासाठी गर्दी सुरू केलेली आहे. 

पारनेर येथील ही संस्था गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत आलेली असून नगर शहरातील एक ठेवीदार सेनापती बापट संस्थेच्या पुणे येथील ऑफिसमध्ये ठेवीची रक्कम मिळण्यासाठी गेलेले होते त्यावेळी त्यांना आम्ही ठेवीच्या रकमा देणे बंद केलेले आहे असे सांगण्यात आले. हतबल झालेले ठेवीदार यांनी त्यानंतर संस्थेच्या पारनेर येथील कार्यालयात भेट दिली त्यावेळी इतरही अनेक ठेविदारांनी ठेवीच्या आशेने कार्यालयात गर्दी केलेली होती. 

नगर जिल्ह्यात अशाच पद्धतीने अनेक आर्थिक संस्था सध्या अडचणीत आलेल्या असून यापूर्वीच दूधगंगा पतसंस्था , नगर अर्बन बँक कर्ज व्यवहार प्रकरण , राजे शिवाजी ग्रामीण पतसंस्था, निघोज येथील मळगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था , सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील पतसंस्था , गोरेश्वर पतसंस्था सध्या अडचणीत असून अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये या संस्थांमध्ये अडकून पडलेले आहेत.   

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे या सर्व प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून ठेवींची रक्कम मिळण्यासाठी ठेविदारांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. राजे शिवाजी ग्रामीण पतसंस्था प्रकरणात कर्जाची रक्कम कर्जधारकांना न देता परस्परच खाजगी सावकाराला वळवण्यात आली म्हणून उपोषण केल्यानंतर उपनिबंधक कार्यालयाला जाग आली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाचा कारभार हा संपूर्णपणे अनागोंदी झालेला असून त्यांच्यावर कुठलाही अंकुश राहिलेला नाही त्यामुळे जिल्हाभरात हजारो ठेवीदार यांचा संघर्ष सातत्याने सुरू आहे. 


शेअर करा