नरेंद्र मोदी यांचा चेहरा म्हणजे ‘ शोले चित्रपटातील सो जा बच्चे नही तो गब्बर आ जायेगा ‘

शेअर करा

शोले चित्रपटातील सो जा बच्चे नही तो गब्बर आ जायेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट शब्दात निशाणा साधलेला असून पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे विरोधकांकडे काय आहे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस करत आहेत मात्र मोदींचा चेहरा इतका भयानक आहे की लोक घाबरत आहेत. मोदी हा चेहरा नाही तर ती भुताटकी आहे. ही भुताटकी आगामी निवडणुकीत उतरवायची आहे . ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे , असे म्हटलेले आहे. 

छत्रपती संभाजीनगर इथे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी भाजपवर टीका करताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा चेहरा म्हणजे , ‘ शोले चित्रपटातील सो जा बच्चे ने तो गब्बर आ जायेगा ‘ असे झालेले आहे. मोदी कधी टीव्हीवर येतील आणि काय घोषणा करतील या दहशतीखाली लोक असून अब की बार चारसो पार म्हणणाऱ्याना ‘ लोकशाही तुमच्या बापाची आहे का ? हे देशातील जनता ठरवेल सरकार कुणाचे ‘ असे स्पष्ट शब्दात भाजपला ठणकावले आहे.


शेअर करा