झोका बांधायच्या नादात बसली फाशी , तेरा वर्षीय मुलाने गमावले प्राण

शेअर करा

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून झोका खेळण्यासाठी दोरी घेऊन झाडावर चढल्यानंतर फांदीला झोका बांधत असतानाच तोल सुटून खाली कोसळल्याने एका मुलाला गळफास बसला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सतीश काळूराम तांबे ( राहणार राळेगण थेरपाळ तालुका पारनेर ) असे तेरा वर्षीय मुलाचे नाव असून मेंढपाळ कुटुंबीयातील सतीश हा सुट्टी असल्याकारणाने पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावच्या शिवारात सांगळे वस्ती इथे मेंढ्या चालण्यासाठी चालण्यासाठी गेलेला होता. 

दुपारी झोका खेळण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाला तो झोका बांधत होता त्याचवेळी त्याचा तोल गेला आणि दोरी त्याच्या गळ्यात अडकली आणि त्याला गळफास बसला. नातेवाईकांनी त्याला पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा फाशी बसून मृत्यू झालेला होता. पारनेर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. 


शेअर करा