नगरमध्ये एसीबीचा धडाका,  अवघ्या ‘ इतक्या ‘ रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात 

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नेवासा तालुक्यातील कुकाणे इथे समोर आलेला असून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुकाने पोलीस दुरुक्षेत्रातील तुकाराम भीमराव खेडकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले आहे. 

अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली असून मंगळवारी सोळा तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास तुकाराम खेडकर हा कारवाईत अडकलेला आहे. 

नेवासा तालुक्यातील एका गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी खेडकर याने खाजगी इसम असलेला नंदू सरोदे आणि पोपट नावाच्या एका व्यक्तीच्या मध्यस्थीने आधी दहा हजार त्यानंतर आठ हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडीनंतर पाच हजार रुपयांवर येऊन हा सौदा ठरला होता. 

फिर्यादी व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि त्यानंतर सापळा रचण्यात आला होता. आपले नियमातील काम करून देण्यासाठी जर कुठे अडचण येत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबरवर संपर्काचे आवाहन विभागाकडून करण्यात आलेले आहे. तक्रारदार व्यक्ती यांची ओळख गुप्त ठेवली जाईल त्यामुळे नागरिकांनी न भिता विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.


शेअर करा