संपदा पतसंस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारेची काँग्रेसमधून हकालपट्टी

शेअर करा

नगर येथील संपदा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला आरोपी ज्ञानदेव वाफारे हा संपदा प्रकरण सुरू असताना काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर अनेकदा दिसून आलेला होता.शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाफारे याच्यावर कारवाईसाठी चर्चा होऊ लागल्यानंतर काँग्रेसने त्याला पक्षातून निलंबित केलेले आहे. 

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ही माहिती दिली असून पत्रकामध्ये , ‘ काँग्रेस पक्ष हा सदैव संपदा नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या बाजूने उभा आहे. संपदा घोटाळा प्रकरणाचा पक्षाने वेळोवेळी निषेध देखील केला. वाफारेला पाठी घालण्याचा कुठलाही प्रश्न नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि हायकमांडच्या निर्देशानुसार वाफारे यांचे निलंबन करण्यात आलेले आहे ‘, अशी माहिती दिलेली आहे. जिल्हा समन्वयक पदावर वाफारे कार्यरत होता त्याच्या जागी आता नवीन पदाधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती करण्यात येईल , असे देखील प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे.


शेअर करा