ब्रेकिंग..अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची पुन्हा ‘ मोठी ‘आगळीक, पहा फोटो

शेअर करा

आतापर्यंत एकदा देखील नाव घेऊन चीनला धमकावण्याची मोदींची हिंमत झालेली नाही. चीनने दगाबाजी करत भारतीय जवानांची हत्या केल्यावर देखील मोदी यांनी चीनला नाव घेऊन धमकावले नाही त्यामुळे मुंहतोड जवाब देण्याची केंद्रातील मोदी सरकारमध्ये हिम्मत नाही हे चीनच्या लक्षात आले आहे. आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असल्याची धक्कादायक माहिती हाती आलेली आहे. भारतातील जनतेला गोदी मीडिया पाकिस्तानकेंद्रित ठेवून प्रत्यक्षात चीनच्या बाबतीत मात्र केंद्र सरकार मवाळ धोरण का अवलंबत आहे हे मात्र गूढ आहे.

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने आता आणखी एक आगळीक केली असल्याचे समोर आले आहे. चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात तब्बल १०१ घरे आहेत. सॅटलाईट इमेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली असून हे गाव सीमारेषेपासून ४.५ किमी आत अंतरावर वसवले आहे. चीनच्या या आगळिकीबद्दल बोलावे तर मोदींचे अपयश उघड होईल म्हणून देशातील गोदी मीडिया मौन बाळगून आहे.

‘एनडीटीव्ही’ ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने हे गाव अरुणाचल प्रदेशमध्ये सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ वसवले आहे. एका सॅटेलाइट फोटोमधून याचा खुलासा झाला आहे. या भागावर भारत आणि चीनचा दावा असून दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र संघर्षाचे ठिकाण म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. ‘एनडीटीव्ही’ वर सातत्याने सत्य मांडले जात असल्यामुळे भाजपकडून हा चॅनेल देशद्रोही असल्याचा बिनबुडाचा आरोप देखील कायम करण्यात येतो मात्र कारवाई का केली जात नाही ? यावर मात्र भाजपकडून मौन धरण्यात येते .

गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाल्यानंतरच्या काही दिवसांनी हे गाव बनवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. एक नोव्हेंबर २०२० रोजी सॅटेलाइट फोटो घेण्यात आला होता. त्यानंतर हा फोटो हाती आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी हे गाव भारताच्या हद्दीत असल्याचे सांगत ही बाब भारतासाठी मोठ्या चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

याआधीदेखील चीनने भूतानच्या हद्दीत एक नवीन गाव वसवले असल्याचे समोर आले होते. चीनकडून सातत्याने आक्रमकपणे विस्तारवादी भूमिका घेतली जात असताना ही आगळीक अतिशय चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लडाखचा वाद अद्यापही शमला नसून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या हद्दीत काही चिनी सैनिक घुसले होते. त्यांना भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा चीनकडे सोपवण्यात आले.


शेअर करा