‘ लो चला मै ‘ तुम्ही घरात थांबा, मोदी निघाले ‘ ह्या ‘ देशाच्या दौऱ्यावर

शेअर करा

कोरोना संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 497 दिवसानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 27 मार्च रोजी मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशाचा 50 वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना संकटानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असल्याने या मोदींच्या या दौऱ्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कोरोना लस घेतल्यानंतर मोदी लगेचच दौऱ्याला सुरुवात करत आहेत.

भारताने बांगलादेशाला आतापर्यंत कोरोनाचे 90 लाख डोस दिले आहेत. भारताकडून आतापर्यंत कोणत्याही इतर देशांना पाठवण्यात आलेले हे सर्वाधिक कोरोना डोस आहेत. या दौऱ्या दरम्यान बांगलादेशची राजधानी ढाका आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या प्रवासी लोकलला मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता आहे.

2020 मध्ये पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पश्चिम बंगालच्या हल्दीबाडी आणि बांगलादेशच्या चिलाहाटी दरम्यान 55 वर्षानंतर रेल लिंकला हिरवा कंदील दाखवला होता. 1965 च्या भारत-पाक युद्धा दरम्यान ही रेल लिंक तुटली होती. 2020 अखेरनंतर ही रेल्वे लिंक जोडण्यात आली होती. डिसेंबर 2020 मध्ये शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल मिटींगनंतर मोदींनी बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती.

कोरोना संकटानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. तब्बल 497 दिवसानंतर मोदी परदेशी भूमीवर पाय ठेवणार आहेत. यापूर्वी मोदी नोव्हेंबर 2019 रोजी ब्राझिलच्या दौऱ्यावर गेले होते. मोदींनी 15 जून 2014 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान म्हणजे 1979 दिवसांत 96 देशांचे दौरे केले होते. मोदींनी 2014 मध्ये 8 देश, 2015 मध्ये 23, 2016 मध्ये 17, 2018 मध्ये 20 आणि 2019 मध्ये 14 देशांचा दौरा केला होता. 2020 मध्ये मोदींना परदेश दौरा करता आला नव्हता. कोरोना संकटामुळे त्यांना हा दौरा करता आला नव्हता.

मात्र काही देशांच्या नेत्यांशी या काळात त्यांनी व्हर्च्युअल मिटिंग केल्याच्या बातम्या अधून मधून आल्या होत्या मात्र प्रत्यक्षात संवाद साधल्याचे चित्र क्वचितच पाहायला मिळाले होते, त्या तुलनेत राहुल गांधी यांनी साधलेल्या संपर्काचे फेसबुक लाईव्ह व्हिडीओ लोकांपर्यंत आले होते. डेन्मार्कच्या हेन्रीक अँडरसन यांच्याशी संवाद साधताना ‘ सक ‘ आणि ‘ शक ‘ वरून झालेली मोदींची भंबेरी देशाने पाहिली होती. मोदी यांच्या अज्ञानावरून सोशल मीडियात मोठी टीका देखील झाली होती तसेच मोदी यांनी विंड टर्बाईन पासून ऑक्सिजन आणि पाणी काढण्याची आयडिया देखील प्रत्यक्षात शक्य नसल्याचे देखील मत त्यावेळी तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले होते .


शेअर करा