पतीला दुसऱ्या महिलेसोबत फिरताना बघितले, संतापाच्या भरात तिने…: पहा व्हिडीओ

शेअर करा

दुसऱ्या महिलेच्या हातात हात घालून फिरणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर संतापाच्या भरात भरबाजारात त्याला मारहाण केली. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल बाजारात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून काही जणांनी पत्नीची बाजू घेतली आहे तर काही जण पतीच्या देखील बाजूने उभे राहिलेले पहायला मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अदनान नावाची व्यक्ती एका तरुणीसोबत बाजारात आला होता. त्याचवेळी आयेशा नावाची महिला त्या ठिकाणी पोहोचली. आपण अदनानची पत्नी असल्याचे ती सांगत होती. तिने भरबाजारात गोंधळ घातला. त्यानंतर भरबाजारात अदनान आणि आयेशा यांच्यात हाणामारी झाली. दोघेही एकमेकांना थप्पड लगावू लागले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. दोघांनीही एकमेकांवर आरोप केले. वर्षभरापूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. काही दिवसांनंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर अदनान याने तिला माहेरी सोडले. मात्र, आपला पती दुसऱ्या महिलेसोबत बाजारात फिरत असल्याचे तिला समजले तेव्हा तिने पाठलाग केला आणि बाजारात पोहोचली.

पती आणि त्याच्यासोबतची तरुणी एका शोरूममध्ये गेले होते. बराच वेळ ते बाहेर आले नाहीत, म्हणून तिने आरडाओरड करत पतीला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. आयेशाला तलाक दिल्याचे पतीचे म्हणणे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अद्याप तलाक झालेला नाही. आयेशा काही जणांना सोबत घेऊन आल्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, यात तो किरकोळ जखमी झाला आहे.


शेअर करा