हनीमूनच्या रात्री नवरी म्हणाली पोट दुखतंय, नवरा औषध घेऊन आला मात्र तोवर …

शेअर करा

लॉकडाऊनमुळे बरेच काळ रखडलेले लग्न झाल्याने नवरदेव खुश होता मात्र नवरीच्या मनात काही वेगळेच चालले होते. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे. नवीन लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. कोरोना काळात लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी यथासांग पार पडल्याने सर्वजणं निश्चिंत होतं. मात्र लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री घडलेल्या प्रकाराने नवरदेव पुरता हादरला आहे.

भिंड पोलीस ठाणे हद्दीत बैरागपूरमध्ये एक घरात नवीन लग्न झालं होतं. मनोज सोनी याने दलालांच्या माध्यमातून 35 हजार रुपये देऊन लग्न केलं होतं. काही जवळचे मित्र या लग्नात उपस्थित होते. सप्तपदी घेत दोघांचाही लग्नसोहळा यथासांग पार पडला.लग्नानंतर तरुण मुलीला घेऊन घरी आला. मात्र नेमक्या मधुचंद्राच्या रात्री 11 वाजता नवरीच्या पोटात दुखू लागलं. यावर नवरदेव म्हणाला की, उन्हाळ्यामुळे त्रास होत असेल. शतपावली केल्यानंतर बरं वाटेल. नवरी तासभर घराबाहेर फेऱ्या मारत राहिली मात्र तरीही पोटदुखी कमी झालं नसल्याचं नवरीने सांगितलं. यानंतर तरुण अर्ध्या रात्री औषध आणण्यासाठी घराबाहेर पडला.

काही वेळानंतर जेव्हा तरुण बाजारातून औषध घेऊन आला तर त्याला धक्काच बसला. खोलीतून नवरी गायब झाली होती. त्याने तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही, अखेर तरुण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. तरुणाने ज्या दलालाकडून मुलीला पैसे देऊन लग्नासाठी तयार केलं होतं, तोदेखील आता संपर्क करीत नाही. मात्र नवरी घरी परतेल, असा पतीला विश्वास आहे. मध्य प्रदेशात तसेच महाराष्ट्रातही लग्नाच्या नावावर धोका देण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. एजंटच्या माध्यमातून विवाहित महिलांचे देखील लग्न लावण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता असून पोलीस तपास सुरु आहे.


शेअर करा