बेशर्मपणाचा कळस..किती रुग्णांचा मृत्यू होतो पाहण्यासाठी ऑक्सिजन केला बंद : पहा व्हिडीओ

शेअर करा

भारतात कोरोनाच्या संसर्गाचा वेग आता मंदावला आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्राणही गेले. दरम्यान, आता एक धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा इथं एका रुग्णालयाच्या संचालकांचा ऑडिओ व्हायरल होत आहे. 26 एप्रिलचा हा ऑडिओ आहे. यावेळी कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलं होतं.

वेगाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओमध्ये संचालक असं म्हणतात की, रुग्णालयात ऑक्सिजन पाच मिनिटांसाठी बंद करून एक रंगीत तालीम घेण्यात आली होती. यानंतर असं समोर आलं होतं की 22 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होऊ शकला असता. संचालकांनीही ही बाब मान्य केली आहे. मात्र यामध्ये कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूबद्दल संचालक बोललेले नाहीत. सदर व्हिडिओमध्ये संचालक आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना दिसत आहेत मात्र त्यांचा चेहरा दिसत नाही.

रुग्णालयाच्या संचालकांचे म्हणणे आहे की, रंगीत तालिम यासाठी करण्यात आली की, गंभीर रुग्ण कोणते ते ओळखता यावं. कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजनची गरज आहे हेसुद्धा पाहण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी यांनी असा प्रकार झाला असल्याचे नाकारले आहे. त्यांच्या मते या रुग्णालयात 26 एप्रिलला 4 आणि 27 एप्रिलला 3 जणांचा मृत्यू झाला होता मात्र आता या पूर्ण ऑडिओची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


शेअर करा