कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी पुन्हा भाजपकडून ‘ हा ‘ पत्ता तर ओवेसी म्हणतात ..

शेअर करा

2022 मध्ये म्हणजे आणखी वर्षभरात देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्या तयारीला भाजपासह काही पक्ष लागल्याचं दिसतंय. कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी पुन्हा उत्तर प्रदेश विधानसभेसाठी हिंदू-मुस्लिम मतांचं ध्रूवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून आतापासून झालेला दिसत आहे . भाजपची बी टीम म्हणून टीका करण्यात आलेल्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी देखील यात रंग भरण्याचे प्रयन्त सुरु केले असून योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही असे म्हटले आहे . पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम हाच मुद्दा पुढे करून भाजप व ओवेसी यांनी एकमेकांना पूरक अशा भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे .

योगी आदित्यनाथ यांना कुठल्याच स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे तर योगी आदित्यनाथ यांनीही ओवैसी हे मोठे नेते असून त्यांचं आव्हान स्वीकारत असल्याचं म्हणाले. एवढच नाही तर एका टीव्ही चॅनल्सशी बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, यूपीत यावेळेसही भाजपचंच सरकार बनणार आणि त्यांना कुणी आव्हान देऊ शकत नाही. औवेसी हे मोठे नेते आहेत, पण यूपीत भाजपा मुल्य आणि मुद्यांच्या आधारावर निवडणूक लढवते. असं असतानाही जर ओवैसी आव्हान देणार असतील तर ते स्वीकारतो असे आदित्यनाथ म्हणाले. येत्या काळात गोदी मीडियावर देखील हिंदू मुस्लिम मुद्दाच जास्त चर्चिला जाणार यात वाद नाही.

बिहार विधानसभेला ओवैसींच्या पार्टीला चांगला यश मिळालं. बंगालमध्ये ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. पण यूपीत मुस्लिमांच्या संख्या पहाता, मोठ्या यशाची एमआयएमला अपेक्षा आहे. त्यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननं छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. तसच असदुद्दीन औवेसींनी 100 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसच ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसारख्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. ओवैसींनी ट्विट करत म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आम्ही 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. तसच पार्टीनं उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरु केलीय. एवढच नाही तर उमेदवारी अर्जही जारी केलेत.


शेअर करा