ऑन ड्युटी झोपा काढणाऱ्या डॉक्टरला तरुणीने कानाखाली वाजवली, पहा व्हायरल व्हिडीओ

शेअर करा

नातेवाईकाच्या उपचारासाठी भल्या पहाटे हॉस्पिटलला पोहोचलेल्या युवतीला बराच वेळ डॉक्टर आढळून आला नाही त्यामुळे तिने आपत्कालीन विभागाच्या शेजारच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं तेव्हा एक डॉक्टर तिथे झोपलेला दिसला. युवतीने त्याचा व्हिडीओ शूट केला मात्र याच वेळी डॉक्टरने तिचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त युवतीने त्याच्या कानशिलात लगावली. हरियाणातील हिस्सारमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संबंधित तरुणी हिस्सारमधील रुग्णालयात आपल्या नातेवाईकावर उपचार करण्यासाठी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोहोचली मात्र रिसेप्शन भागात बराच वेळ कुठलाही डॉक्टर दिसत नव्हता. तिने आपत्कालीन विभागाच्या शेजारच्या खोलीत पाहिलं, तेव्हा एक डॉक्टर आणि अन्य व्यक्ती तिथे झोपलेले दिसले. तरुणीने त्याचा व्हिडीओ चित्रित करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बेंचवर एक जण पांघरुण ओढून झोपला होता. तरुणीने डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा तो ओपीडीमध्ये खुर्चीवर जाऊन बसला.

शूट केलेला हा व्हिडीओ हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांना दाखवण्याची धमकी तरुणीने दिली. त्यामुळे डॉक्टरने तिच्या हातून मोबाईल खेचून घेतला. तरुणीने मोबाईल परत देण्यास सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे चिडून तिने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून तिच्या या व्हिडिओनंतर डॉक्टर व त्यांचे सहकारी देखील आक्रमक झालेले असून पोलिसांनी संबंधित युवती आणि तिच्यासोबत आलेल्या युवकावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.


शेअर करा