” ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद “

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी कधी पत्रकार परिषद घेत नाहीत, अशी टीका काँग्रेसकडून सातत्यानं केली जाते. आजही हाच धागा पकडून महाराष्ट्र काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे . महाराष्ट्र काँग्रेसनं राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे दोन फोटो ट्विट केलेत मात्र मोदींचं कॅप्शन असलेला फोटो चक्क ब्लँक म्हणजेच काळा ठेवण्यात आला आहे. मोदी यांनी आतापर्यंत फक्त एकदा ती देखील निवडक पत्रकार सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. मोदी त्यावेळी अत्यंत मोजके बोलले होते आणि बहुतांश उत्तरे ही अमित शाह यांनीच दिल्याचे त्यावेळी दिसले होते .

महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन फोटो ट्विट करण्यात आले आहेत. यातल्या पहिल्या फोटोत राहुल गांधी आहेत. या फोटोला राहुल गांधी पत्रकार परिषद घेताना असं कॅप्शन देण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोला नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेताना असं कॅप्शन देण्यात आलंय. पण दुसरं कॅप्शन असलेला फोटो ब्लँक ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी पत्रकार परिषदच घेतली नाही हे यातून सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

हे फोटो ट्विट करताना काँग्रेसनं #BJPFearsRahulGandhi या हॅशटॅगचा वापर केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलसोबत अनेक अकाऊंट्सवरून हा हॅशटॅग वापरून ट्विट्स केले जात आहेत. राहुल गांधी सातत्यानं आक्रमकपणे भाजपाविरोधी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे भाजप राहुल गांधींना घाबरत आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे.


शेअर करा