मेहुणीवर जीव जडलेल्या दाजीने बायकोला मारण्यासाठी केले बँक लोन : कुठे घडली घटना ?

शेअर करा

लग्न झाल्यावर काही वर्षांनी पतीचा मेहुणीवर जीव जडला मात्र मेहुणीशी लग्न करायचे तर बायको अडसर ठरत होती. शेवटी त्याने बायकोची सुपारी देण्याचा निर्णय घेतला मात्र सुपारी घेणाऱ्याला देण्याइतके देखील पैसे त्याच्याकडे नव्हते म्हणून त्याने कर्ज काढून सुपारी दिली. बिहारमधील पाटणा इथे ही घटना घडली असून यात बायकोचा खून झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पटना येथील परसा बाजारातील जक्कनपूर येथील रहिवासी पती शंभूचा लॉन्ड्रीचा धंदा आहे.त्याचे काही वर्षांपूर्वी रुबी देवी नामक महिलेशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या आणि त्यानंतर रुबी देवी पुन्हा गर्भवती होती. तिसरीही मुलगीच होईल या भीतीनं पतीनं रुबीच्या हत्येचा कट रचला.

लॉन्ड्रीचा धंदा असल्याने त्याच्याकडे येणाऱ्या एकजणाशी त्याची ओळख झाली. त्याने या तरुणाला मेहुणीवर प्रेम असल्याचं सांगितलं आणि जोपर्यंत बायको जिवंत आहे तोपर्यंत तिच्याशी लग्न करू शकणार नसल्याचे सांगितले . त्यातून मग बायकोची सुपारी सदर तरुणाला देण्याचे ठरले मात्र त्यासाठी लागणारे पैसे शंभूकडे नव्हते . सदर तरुणाने २ लाख रुपयांची मागणी केली होती आणि शंभूकडे इतके पैसे नव्हते त्यामुळे त्याने त्याच्याकडील २० हजार आणि बँकेतून कर्ज काढून ३० हजार अशी रक्कम जमा केली आणि ५० हजार ह्या युवकाला दिले आणि काम झाल्यावर उरलेले पैसे देण्याचे वचन दिले .

पती आणि गुन्हेगारानं पत्नीला ठार मारण्याचं षड्यंत्र रचलं आणि त्यानुसार 9 जुलैला हत्या करण्यात आली. सुरुवातीला हा प्रकार फक्त मुली होण्याच्या भीतीतून वाटत होता मात्र त्यात मेहुणीच्या प्रेमाचा अँगल आढळला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर व्यक्तीच्या पत्नीवर गोळी झाडणाऱ्या ऋषी नामक युवकाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


शेअर करा