‘ त्या ‘ महिला पोलिसाचे क्वारन्टाइन सेंटरमध्ये विवाहित पुरुषासोबत इलू इलू होते सुरु : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

आतापर्यंत क्वारन्टाइन सेंटरमध्ये छेडछाड आणि विनयभंग झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या मात्र आता क्वारन्टाइन सेंटरमध्ये प्रेमप्रकरणे देखील फुलू लागली आहेत. असेच एक प्रेमप्रकरण क्वारन्टाइन सेंटरमुळे चर्चेत आले आहे . महाराष्ट्रातील नागपूर येथील सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्राला क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहे,असे असताना या सेंटरमध्ये एक महिला पोलीस आणि तिचा प्रियकर ( तो देखील केंद्रीय सरकारी कर्मचारीच आहे ) यांच्या प्रेमाच्या सुरस कथा परिसरात चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र प्रियकर विवाहित असल्याने प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले .

उपलब्ध माहितीनुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या एका विभागामार्फत पोलिस नियंत्रण कक्षात शिबिर घेण्यात आले होते. यात ती महिला पोलीस राणी ( नाव काल्पनिक ) सहभागी झाली होती . याचवेळी तिथे तिची राजा ( नाव काल्पनिक ) याच्याशी ओळख झाली . मोबाइल क्रमांकाची देवाण-घेवाणही झाली आणि अवघ्या तीन दिवस चाललेल्या शिबिरादरम्यान दोघांत प्रेम बहरले.त्यानंतर देखील ते एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.

पुढे जाऊन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विशेष शाखेतील १२ व आर्थिक गुन्हे शाखेतील १५ तसेच पोलिस दलातील अन्य कर्मचाऱ्यांना सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्वारन्टाइन करण्यात आले, यात राणी देखील होती . ती तेथे जाताच राजा देखील तेथे पोहोचला. राजा माझा पती असल्याची नोंद राणीने केली आणि दोघेही तिथेच राहायला लागले.राजा राणीचा संसार असा तिथे सुरु झाला.

राजा इकडेच जास्त रमला आणि घराकडे जाणे झाले नाही मात्र राजा विवाहित असल्याने ही चर्चा त्याच्या घरापर्यंत पोहचली. बायकोने आणखी माहिती काढायला सुरु केली आणि राजा पीटीएसमध्ये राहतोय आणि तिथे त्याच इलू इलू सुरु असल्याचे राजाच्या बायकोला कळाले. पत्नीचा पारा चढला आणि नातेवाइकासह पीटीएसमध्ये धडकली. तिने पतीला जाब विचारला. पतीला परत पाठवा, अशी विनवणी तिने येथील अधिकाऱ्यांना केली. मात्र, तिला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर पत्नीने बजाजनगर पोलिस स्टेशन गाठून पतीच्या विरोधात तक्रार दिली.

पत्नीच्या म्हणण्यानुसार, ” २००९ मध्ये माझे राजासोबत लग्न झाले होते. मला एक मुलगा आहे. त्यामुळे माझ्या पतीची राणीच्या तावडीतून सुटका करा. मला तुझ्यासोबत राहायचे नाही. तू आत्महत्या कर, मुलाला मारून टाक, मला घटस्फोट दे, राणी माझा व माझ्या आईचा सांभाळ करेल, असे आता पती राजा म्हणतो आहे. पीटीएस प्रेमीयुगुलाचा अड्डा झाला काय ? उद्या माझे व माझ्या मुलाचे वाईट झाल्यास त्याला राणीच जबाबदार राहील ” असे पत्नीचे म्हणणे आहे

सुरुवातीला पीटीएसपर्यंत मर्यादित असलेली ही प्रेमकहाणी आता संपूर्ण शहर पोलिस दलात पसरली आहे. तक्रारीवरून पोलिस अधिकारी काय कारवाई करतात, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे . पत्नी व तिचे नातेवाईक यावरून पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेणार असल्याचे समजते.


शेअर करा