‘ देश का नेता कैसा हो ‘ म्हणताना स्टेज संपले अन भाजप नेता धपकन जमिनीवर : पहा व्हिडीओ

शेअर करा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे. रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधत असताना खरगोन जिल्ह्यात एका कार्यक्रमात वेगळीच घटना घडली. शिवराज सिंह चौहान स्टेजवर आल्यानंतर अनेक नेते मंचावर चढले. त्यावेळी एका नेत्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. प्रदेश का नेता कैसा हो.. असं त्याने म्हणताच तो स्टेजवरून कोसळला मात्र हा प्रकार पाहताच उपस्थित सर्वजण त्याच्यावर फिदीफिदी हसू लागले. दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून मध्य प्रदेशात याची जोरदार चर्चा आहे .

उपलब्ध वृत्तानुसार , मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील खंडवा लोकसभा मतदारसंघात शिवराज सिंह चौहान यांची जनदर्शन रॅली झिरन्या ब्लॉक मुख्यालयात पोहोचली होती. या ठिकाणी सभेला संबोधित केल्यानंतर भीकनगावला जाताना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एका सभेला संबोधित केलं त्याचवेळी भीकनगावचे भाजप नेते जगदीश जायसवाल यांनी माईक हातात घेऊन जोरदार नारेबाजी देण्यास सुरुवात केली.

जगदीश जायसवाल घोषणाबाजी करण्यात प्रचंड व्यस्त होते त्यांना स्टेज संपल्याचं लक्षातच आलं नाही. ते आणखी थोडे पुढे गेले. त्याचवेळी शिवराज सिंह चौहान स्टेजवर आले होते. त्यामुळे जायसवाल यांना अधिकच स्फूरण चढलं. त्यांनी आणखी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रदेश का नेता कैसा हो… असं म्हणत जायसवाल यांनी एक पाऊल पुढे टाकताच त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले.

जायसवाल कोसळल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ त्यांना उचललं. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र जायसवाल स्टेजवरून कोसळल्याने लोकांमध्ये एकच खसखस पिकली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ काढला होता. काहींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप नेत्याच्या या फजितीमुळे उपस्थित लोकांचे देखील चांगलेच मनोरंजन झाले.


शेअर करा