‘ वसुली एजंटने भंडावून सोडले ‘ आधी बापाची तर आता मुलाची आत्महत्या

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशी एक घटना बीड जिल्ह्यात उघडकीला आली आहे. खाजगी सावकारीने त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबातील एका तीस वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे ही घटना घडलेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच युवकाच्या वडिलांनी सुमारे एक वर्षापूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानंतर खाजगी सावकारीच्या पाशाने यात कुटुंबातील मुलाला देखील आत्महत्या करण्याची वेळ आली. ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद ( वय 30 ) असे या तरुणाचे नाव असून या तरुणाकडे तीन एकर शेतीवर खाजगी बँकेचे कर्ज होते. सातत्याने कर्जाच्या वसुलीसाठी त्याला बँकेने व तिच्या वसुली एजंट यांनी भंडावून सोडले होते त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा युवक मानसिक दृष्ट्या खचला होता तर दुसरीकडे शेतातील नापिकीमुळे ही कर्ज देखील फिटत नव्हते.

अखेर शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वर यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी आठ वाजता ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे


शेअर करा