पुणे शोकाकूल..अवघ्या काही दिवसांवर आले होते लग्न मात्र अचानक..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे घडलेली असून लग्नाच्या तयारीत असताना संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे . पुणे येथून लग्नाची खरेदी करुन बहीण-भाऊ दुचाकीवरुन घरी जात असताना त्यांचा अपघात होऊन यात बहिणीला तिचा जीव गमवावा लागलेला आहे . दौंड तालुक्यातील वरवंड इथे ही घटना घडली असून घरातील मंगलमय वातावरण अवघ्या काही तासात शोकाकुल झालेले आहे

उपलब्ध माहितीनुसार , प्रतिक्षा सदाशिव कांबळे (वय २१) असे मयत मुलीचे नाव असून शुभम सदाशिव कांबळे दोघेही रा.मलठण ता.दौंड जि.पुणे असे जखमी भावाचे नाव आहे . १९ तारखेला बुधवारी पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीला पाठमागुन येत असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायंकाळी सात वाजता ही दुदैवी घटना घडली . बहीण आणि भाऊ पुणे इथे लग्नाची काही खरेदी करून आपल्या घरी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनास्थळी एका बाजूला प्रतिक्षाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह तर दुसरीकडे लग्नाच्या खरेदीच्या कपडयांची पिशवी पाहून अनेक जणांना जागीच शोक अनावर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दौंड तालुक्यातील प्रतिक्षा कांबळे ही मलठण येथील रहीवाशी असून अवघ्या काही दिवसावर तिचे लग्न येऊन ठेपले होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती भावासोबत पुणे इथे खरेदीसाठी गेली होती. खरेदी केल्यावर भावासोबत ती पुन्हा घरी सोलापूर महामार्गाने जात असताना सायंकाळी साडे सहा वाजता वरवंड येथील कौठीचा मळा भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक दिली. वाहनाचे चाक अंगावरुन गेल्याने प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ शुभम किरकोळ जखमी झाला.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ ही माहिती पाटस टोलप्लाझाचे अधिकारी वैभव चव्हाण यांना कळवताच तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी आली मात्र तोवर उशीर झाला होता.पोलिस हवालदार घनशाम चव्हाण, अजित इंगवले, समिर भालेराव,सुनिल बगाडे यांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिला असून अपघातानंतर अज्ञात वाहन निघुन गेले असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


शेअर करा