गूढ वाढले ? पाच मार्चला ‘ सोनम ‘ घरातून गेली अन अकरा मार्चला सापडली मात्र सोबत..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून लातूर शहरातील भाग्यनगर परिसरात राहत असलेल्या एका युवक-युवतीने अहमदपूर तालुक्यात गुग्दल इथे असलेल्या शिवारातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणीचे नाव सोनम असे असून पाच मार्च रोजी सकाळी ती ब्युटी पार्लरला जात आहे असे सांगून ती घराबाहेर पडली होती. दुपारी तिच्याशी संपर्क झाला तेव्हा तिने विवेकानंद चौक येथे असल्याचे सांगितले मात्र उशिरापर्यंत ती घरी आली नाही अखेर 7 मार्च रोजी विवेकानंद पोलीस ठाण्यात ती हरवली असल्याची नोंद करण्यात आली.

तपास सुरु असतानाच 11 मार्च रोजी अहमदपूर तालुक्यातील गुग्दल येथील शिवारात सोनम तसेच एका तरुणाचे देखील प्रेत आढळून आले. हा तरुण देखील न्यू भाग्यनगर येथील रहिवासी असून अभिजीत केदार शिंदे असे त्याचे नाव आहे. सदर प्रकरणात सोनमचे काका यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.

विहिरीत बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मात्र त्या दोघांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली की इतरही काही प्रकार त्यांच्या सोबत घडलेला आहे याचा पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा